देशीची चव विदेशीला नाही.
PRESS MEDIA LIVE :
पिंपरी - मोशी उपबाजारात परदेशी कांदा दाखल होऊनही स्थानिक कांद्यानेच भाव खाल्ल्याचे चित्र पाहायला मिळाले. परदेशी कांद्याला चव नाही. आकारातही फरक आहे. त्यास मागणी नसल्याने विक्री करताना दमछाक आणि नुकसान होण्याची भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.
कांद्याची किंमत नियंत्रित ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या मोशीतील नागेश्वर उपबाजारात इजिप्तचा कांदा उतरला आहे. भारतीय गावरान कांद्याला 35 ते 40 तर परदेशी तुर्कस्तानी कांद्याला 30 रुपयांचा दर मिळत आहे. आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला पाणचट व सुमार दर्जाचा असल्याने व्यापारी वर्गाकडून या कांद्याच्या विक्रीविषयी शंका उपस्थित केली जात आहे.डाळिंबासारखा दिसणारा आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला मात्र अत्यंत सुमार दर्जाचा आहे आपल्या देशी ची चव विदेशी कांद्याला नाही असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
भारतीय गावरान कांदा प्रतवारीनुसार 35 ते 40 रुपये दराने खरेदी होत आहे. नागेश्वर उपबाजारात गावरान देशी कांद्याची आवक होत असून 40 रुपये पर्यंत गावरान कांद्याला प्रती किलोला दर मिळतोय. कांद्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अन्य देशातून कांद्याची आयात करण्याचे धोरण केंद्र सरकारने अवलंबले आहे. त्यामुळे भारतात आलेल्या इजिप्तच्या कांद्याची खरेदी करून तो मोशी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे.