केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रकृती स्वास्थ चांगले लाभावे यासाठी भिक्खू संघातर्फे बुद्ध वंदना
अभिनेत्री पायल घोष ने हो केली सामूहिक बुद्ध वंदना
PRESS MEDIA LIVE :
मुंबई दि. 3 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना झालेली कोरोनाची बाधा दूर व्हावी आणि त्यांना चांगले स्वास्थ लाभावे यासाठी आज भारतीय भिक्खू संघातर्फे मंगलमैत्री आणि बुद्ध पूजा करण्यात आली.घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथील बुद्धिस्ट मॉनेस्ट्री भिक्खू नीवास मध्ये पूज्य भिक्खू संघाचे आशीर्वाद घेऊन अभिनेत्री पायल घोष यांनी सामूहिक बुद्ध वंदना बुद्ध पूजेत सहभाग घेऊन बौद्ध भिक्खुंना कठीण चिवरदान केले. यावेळी पूज्य भदंत संघकीर्ती महाथेरो भदंत विरत्न थेरो सह भिक्खू संघ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक रिपाइं चे प्रसिद्धिप्रमुख हेमंत रणपिसे; तसेच काकासाहेब खंबाळकर; डी एम चव्हाण; सोना कांबळे; श्रीधर साळवे;कैलास बर्वे; अंकुश कांबळे; बापू जगधने; सत्यवान इंगळे; रवी नेटवटे;आदी मान्यवर उपस्थित होते.
रिपाइं महिला आघाडी च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनेत्री पायल घोष यांनी माता रमाबाई आंबेडकर नगर येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अभिनेत्री पायल घोष ने जय भीम चा नारा दिला.