सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची संमती अनिवार्य.
PRESS MEDIA LIVE :
मुंबई - सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची संमती अनिवार्य आहे. एखाद्या राज्यात तिथल्या सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय तपास करू शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. याच मुद्यावरून महाराष्ट्राचे वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना आपलं मत मांडलं आहे . 'सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे गुरुवारी स्पष्ट केले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.'
दरम्यान, भाजपेतर पक्षांची सत्ता असणाऱ्या महाराष्ट्रासह आठ राज्यांमधील सरकारांनी सीबीआयला दिलेली सामान्य संमती मागे घेतली आहे.त्यामुळे त्या राज्यांमधील सरकारांच्या परवानगीशिवाय सीबीआय तिथे तपास करू शकणार नाही. त्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्वाळा आणखी महत्वपूर्ण ठरणार आहे.