मुंबई विधानपरिषद :

 विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर,  तर राष्ट्रवादीकडून खडसेंना उमेदवारी .



मुंबई – राज्यपालांकडून विधान परिषदेत नियुक्त करण्यात येणाऱ्या सदस्यांसाठी आज 12 जणांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. यात शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. तर राष्ट्रवादी कडून भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी चार जणांची शिफारस करण्यात आली आहे.

पक्ष व उमेदवारांची नावं –

काॅंग्रेस –

1) सचिन जाधव

2) रजनी पाटील

3) मुजफ्फर हुसैन

4) अनिरूद्ध वणगे – कला

राष्ट्रवादी काॅंग्रेस –

1) एकनाथ खडसे

2) राजू शेट्टी

3) यशपाल भिंगे

4) आनंद शिंदे – कला

शिवसेना –

1)उर्मिला मातोंडकर

2) नितीन बानगुडे पाटील

3) विजय करंजकर

4) चंद्रकांत रघुवंशी

Post a Comment

Previous Post Next Post