केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले.


संविधान दिनानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या निवासस्थानी उद्या संविधान वाटप.

PRESS MEDIA LIVE :

मुंबई दि.25 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांच्या बांद्रा पूर्वेतील संविधान निवासस्थानी 71 व्या संविधान दिना निमित्त 71 संविधान ग्रंथाचे वाटप उद्या दि.26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता  करण्यात येणार आहे. यावेळी 11 किलो पेढे वाटप ही करण्यात येणार आहे.

संविधान हा भारतीय लोकशाहीचा प्राण आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला  संविधान  26 नोव्हेंबर 1949 रोजी दिले.त्याला आता 70 वर्षे पूर्ण होऊन 71 वा संविधान देशभर साजरा केला पाहिजे. संविधान हे देशाचे शक्तीस्थान आहे.संविधान दिनाचा उत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी उद्या 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1वाजता संविधान निवासस्थान बांद्रा पूर्व येथे संविधान वाटप करण्यात येणार आहे. अशी महिती ना रामदास आठवले यांनी दिली आहे. 



         

         

Post a Comment

Previous Post Next Post