महाराष्ट्र



कुसुमवत्सल्य फौंडेशन प्रस्तुत आणि सहारा प्रोडक्शन हाउस यांच्या संयुक्त विद्यमाने *महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२०* ही व्यक्तिमत्त्व स्पर्धा 

सौ. सीमा अनिल इंग्रोळे यांची वाढतीलोकप्रियता...


एकविसाव्या शतकातील स्त्रीचे सशक्त रूप जगासमोर येण्यासाठी आणि आजच्या युगातील स्त्रीला
मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची      आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांना संसार आणि घरकाम यात गेले सहा महिने अडकून रहावे लागले त्यातून त्यांना ऊर्जा प्राप्त होण्यासाठी विरंगुळा म्हणून ही स्पर्धा खास महिलांसाठी आयोजित केली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन होणार आहे, सर्व स्पर्धकांना व्हिडिओ कॉल द्वारे मेकअप, रॅम्पवॉक, स्वतःची माहिती, इत्यादी साठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्या नंतर त्यांची व्हिडिओ द्वारे अंतिम फेरीसाठी निवड होईल.

अंतिम फेरीतील २० स्पर्धकांना महाबळेश्वर येथे ३ दिवस  प्रशिक्षण देण्यात येणार आहे.अंतिम स्पर्धकांसाठी फोटोशूट , रॅम्पवॉक , प्रश्न - उत्तरे , वक्तृत्व, निबंध अशा विविध पातळीवर स्पर्धा होईल. त्यातून अंतिम फेरीसाठी विजेते निवडले जातील.

स्त्री सुद्धा देवी प्रमाणेच अष्टभुजा , दशभुजा आहे.घर, नोकरी, व्यवसाय सांभाळत असताना तिला सामाजिक भान देखील असतेच. स्त्री च्या व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंना या स्पर्धेद्वारे व्यासपीठ मिळवून देण्याचा,तिच्या कलागुणांना वाव मिळावा व तिचा आत्मविश्वास दृढ करण्याचा संकल्प या स्पर्धेद्वारे असल्याचे कुसुमवत्सल्य फौंडेशनच्या अध्यक्ष सौ वैशाली पाटील यांनी सांगितले. 

प्राथमिक व अंतिम फेरी तील स्पर्धकांना प्रसिद्ध ग्रूमिंग प्रशिक्षक जुई सुहास प्रशिक्षण देणार आहेत. अंतिम स्पर्धेसाठी फॅशन, चित्रपट,  सामाजिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर परीक्षक म्हणून लाभले आहेत. कलानिकेतन एंटरटेनमेंटस् या  इव्हेंट ची व्यवस्था पहात असून सहारा प्रोडक्शन हाउस, राजेंद्र भवाळकर आणि सुप्रिया ताम्हाणे यांचे ही सहकार्य या स्पर्धेला लाभले आहे.

*महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० या स्पर्धेमध्ये मुळच्या सांगलीच्या असलेल्या व सद्या मलेशिया येथे राहात असलेल्या सौ. सीमा अनिल इंग्रोळे यांनी सहभाग घेतला आहे.* मलेशियामध्ये राहूनसुध्दा महाराष्ट्राच्या मातीबद्दल त्यांचे असणारे प्रेम पाहून त्यांच्याबद्दल प्रचंड लोकप्रियता निर्माण झाली असून महाराष्ट्राची सौभाग्यवती आपणच होणार असे त्यांनी म्हटले आहे.*

Post a Comment

Previous Post Next Post