PRESS MEDIA LIVE :
सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आवर घाला
सार्वजनिक ठिकानी होणाऱ्या गर्दीला आवर घाला. नियमांचे काटेकोर पालन करा, अशा सूचना केंद्र सरकारने आपल्या नवीन गाइडलाइन्सद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्या आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यासह इतर निर्बंध लावण्याचे राज्यांना अधिकार आहेत. मात्र केंद्राच्या संमतीशिवाय लॉकडाऊन करता येणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 ते 31 डिसेंबर या काळासाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. देशभरात कोरोना संसर्ग वाढीचा वेग कमी होत असताना देशाच्या काही भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. सणांचे दिवस आणि हिवाळा पाहता अधिक सतर्प राहणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.संबंधित शहरातील, परिसरातील परिस्थिती पाहून राज्य सरकार रात्रीची संचारबंदी लागू करू शकते. मात्र, कंन्टेन्मेंट झोनबाहेर लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी केंद्र सरकारला विश्वासात घ्यावे लागेल. परस्पर लॉकडाऊन जाहीर करता येणार नाही, असे या गाईडलान्समध्ये म्हटले आहे. गर्दी होणाऱया सार्वजनिक ठिकाणांवर विशेषता बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूकीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करावे.़ गर्दीला आवर घाला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे. मास्कचा वापर न करणाऱयांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असेही यात म्हटले आहे.
काय आहे गाईडलाईन्स?
- कंन्टेन्मेंट झोनवर विशेष लक्ष केंद्रित करावे. या झोनमध्ये नियमांचे काटेकोर पालन होते का नाही? हे पाहण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची आहे.
- चित्रपटगृहे, थिएटर्स 50 टक्के प्रेक्षक क्षमतेने चालवू शकतात.
- कंन्टेन्मेंट झोनमध्ये प्रत्येक घरातील व्यक्तीची कोरोना चाचणी करावी. या झोनची माहिती वेबसाईटवर देण्यात यावी.
- स्थानिक परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार निर्बंध लावू शकते.
- बंदिस्त सभागृहांमध्ये होणारे सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमांना 50 टक्के प्रेक्षक क्षमता पिंवा जास्तीत जास्त 200 लोक हजर राहू शकतात. मात्र, कोरोनाची स्थिती पाहून राज्य सरकार संख्येवर निर्बंध लावू शकते.