कोरोना महामारीचे संकट.
कोरोना वाढविण्यास हातभार लावायचा. ते वाढले की त्यावर सरकारला कोंडीत पकडायचे, असा विचार करणे म्हणजे आपल्याच प्रजेला डोळय़ादेखत महामारीच्या कत्तलखान्यात पाठविण्यासारखे आहे. दिल्लीत आता 'मास्क' सक्तीचा. न घालणाऱयांना दोन हजारांचा दंड असा नियम लागू केला आहे. वारंवार हात धुण्यासंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. नव्या लॉकडाऊनमध्ये बाजार वगैरे बंद राहतील. अहमदाबादमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याचा त्यांनी काढलेला अर्थ असा की, दिवसा कोरोना विषाणू झोपतो व रात्री तो फिरत राहतो. महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की, ''हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?'' त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला 'धुतले' ते काय कमी झाले. आता जनता हात धूत आहे. मास्क लावत आहे. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल तर लोकांची शिस्त का बिघडवता? 'कोरोना महामारीचे संकट चीनमधून आले हा समज खोटा आहे. कोरोना महामारीचे बाप आपल्या आसपास वावरत आहेत. आपल्या पंतप्रधानांचे तरी ऐका असे सांगणे हा सुद्धा अपराध ठरतोय. कारण पंतप्रधान फक्त भाजपचे किंवा भाजपशासित प्रदेशांचे असा नवा पायंडा या मंडळींनी पाडला आहे. तो लोकशाही, स्वातंत्र्य व भारताच्या संघराज्यास घातक आहे. देशात महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगार, कश्मीरातील रक्तपात, चीनची लडाखमधील घुसखोरी असे अनेक चिंतेचे विषय आहेत. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी शुद्ध भगवा व कोरोना महामारीसारखे विषय वाढवले जात आहेत काय? पंतप्रधान मोदी हे जागतिक 'जी-20' संमेलनात त्यांनी कळवळून सांगितले, दुसऱया विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळय़ांत मोठे संकट आहे. मानवतेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे वळण आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, पण हे झाले जगासाठी. आपल्या देशाचे काय? तेथे दिव्याखाली अंधार आहे व कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून 'शुद्ध' भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदी यांच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे 'बाप' बनून लोकांना धोक्यात का ढकलता, एवढाच आमचा सवाल आहे. कोरोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱयांनी समजून घ्यावे.
Tags
Maharastra-