ग्रामपंचायत निवडणूका.


 ग्रारापंचायत निवडणुका : एक डिसेंबर 2020 रोजी मतदार याद्या प्रसिद्ध  होणार.


लवकरच होऊ घातलेल्या राज्यभरालीत १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १ डिसेंबर २०२० रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर ७ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शनिवारी दिली. यासंदर्भात मदान म्हणाले की, एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित १ हजार ५६६; तसेच जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित १२ हजार ६६७ अशा एकूण १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी या मतदार याद्या तयार केल्या जातील.विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जातील. या प्रारूप मतदार याद्यांवर ७ डिसेंबर २०२० पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील, अशी माहिती मदान यांनी दिली

प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. हरकती आणि सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० डिसेंबर २०२० रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असेही मदान यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post