ऋतूमानातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होऊ लागली.
PRESS MEDIA LIVE :
प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. एडिस इजिप्ती हा डास दिवसा चावणारा असून, त्याच्या माध्यमातूनच डेंग्यूचा प्रसार होत असतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. डास चावल्यानंतर पाच ते सहा दिवसांनी डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात. परंतु, काही वेळा लक्षण दिसण्यास 10 दिवसांपर्यंतचा देखील कालावधी लागतो. डेंग्यू व चिकुनगुनिया साथीचे आजार असल्याने ते एकमेकांपासून बाजूला करू शकत नाही. डेंग्यूमध्ये ताप येतो चिकुनगुनियामध्ये तापाबरोबरच सांधे दुखू लागतात. यामध्ये प्लेटलेट कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जिल्ह्याच्या अनेक भागात सध्या डेंग्यू व चिकुनगुनियाची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या ठिकाणी फवारणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिले आहेत.
डेंगू मध्ये अचानक ताप येणे. डोकेदुखी, अंगदुखी, कणकण, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे आढळतात. चिकुनगुनियामध्ये तापाबरोबरच सांधे दुखू लागतात. काहीवेळा हात-पाय सुजतात. दरदरून घाम येणे. प्लेटलेट कमी होणे ही लक्षणे आहेत. प्रतिबंध हाच डेंग्यू आणि चिकुनगुनियासाठी उपाय आहे. डासांची पैदास आणि उत्पत्ती होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. ताप व अंगदुखी झाल्यास औषध घेऊन घरी बसू नये. त्यासाठी आवश्यक त्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे. कारण, डेंग्यू, चिकुनगुनिया यावर अद्याप ठराविक औषध नाही. पूरक औषधे दिली जातात. त्यामुळे खबरदारी घेणे हाच उपाय आहे, असे डॉ. विदूर कर्णिक यांनी सांगितले
शिरोळात डेंग्यूने महिलेचा मृत्य
येथील शिवाजीनगरमधील किशोरी विलास काशीद (वय 28) या महिलेचा बुधवारी डेंग्यूने सांगली येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.किशोरी यांना तीन दिवसांपूर्वी ताप आला होता. रक्त तपासणीनंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. शिरोळ व जयसिंगपूूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सांगली येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भाऊ बबलू काशीद यांनी दिली. नगरपरिषदेने तत्काळ डास प्रतिबंधक फवारणीबरोबर घर टू घर आरोग्य तपासणी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परिणाम दिसू लागले आहेत.