संविधान सन्मान दिन साजरा.
PRESS MEDIA LIVE : कबनूर :
कबनूर बौध्द समाज संस्कार केंद्रच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ६९ वा. *संविधान* *दिन* मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. समाजभूषण शशिकांत राज अध्यक्षस्थानी होते.
स्वागत/ प्रास्ताविक बी.जी.देशमुख सर यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या अपेक्षा कांबळे वहिनी यांचेहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तर सुरेश तानाजी कामत यांचेहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व श्रीकांत धोंडीराम कांबळे यांचेहस्ते संविधानप्रत चे पूजन करण्यात आले.
बौध्दाचार्य शितल बाळासो कांबळे यांनी ञिशरण, पंचशिल व भिमस्तुती ग्रहण करून *संविधान* *उद्देशिका* चे वाचन करून शपथ दिली.
यावेळी प्रा. अशोक कांबळे सर, मारूती मानकर सर, सुहास कांबळे, शितल कांबळे, बी.जी. देशमुख, समाजभूषण शशिकांत राज यांची संविधान गौरवपर भाषणे झाली.
कार्यक्रमास माजी उपसरपंच कुमार कांबळे , माजी ग्रा.प.सदस्य नारायण फरांडे, आकाश कांबळे, ताराबाई कांबळे, सुनिल कांबळे ,दगडू जमदाडे, प्रशिक राज , युवराज कांबळे, सागर कांबळे, मारूती कामत, इ. प्रमुखांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. केंद्राचे उपाध्यक्ष बबनराव इंगळे यांनी आभार मानले.