प्रबोधिनीत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :
इचलकरंजी ता.२६ , भारतीय संविधानाने सांगितलेली मूल्यव्यवस्थाच भारताला सर्वार्थाने महासत्ता बनवू शकते.कारण राज्यघटनेने सांगितलेले तत्वज्ञानच सर्व प्रकारच्या अनिष्ट शृंखला तोडू शकते.सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनेसाठी भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे ,मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्ये यांची जोपासना केली पाहिजे. तसेच राज्यघटनेने दिलेला मताचा अधिकार सजगपणे बजावला पाहिजे असे मत प्रा.रमेश लवटे यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित 'भारतीय संविधान दिन ' कार्यक्रमात बोलत होते.
प्रारंभी प्रसाद कुलकर्णी भारतीय स्वातंत्र्यलढा व संविधान निर्मितीचा आढावा घेतला. घटना समितीचे अध्यक्ष डॉ .राजेंद्र प्रसाद ,मसुदा समितीचे अध्यक्ष व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदींसह सर्वांचे महत्व स्पष्ट केले.तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले.यावेळी प्रकाश सुलतानपुरे, नौशाद शेडबाळे,शिवाजी शिंदे, दयानंद लिपारे, राजू खराडे,वीरभद्र चिखले, ए.डी.हेरलगे,रशीद लोहरे, रमजान शेख,सुयश मोहिते,बाळासाहेब पाटील आदिंसह अनेकजण उपस्थित होते.पांडुरंग पिसे यांनी आभार मानले.