शमनेवाडीत चोरट्यानीं लाखोंचा ऐवज लंपास केला.
PRESS MEDIA LIVE : बेडकिहाळ :
विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :
बेडकिहाळ सर्कल
परिसरातील शांतीनगर शमनेवडी येथील एका कुलुप असलेल्या घराला चोरट्यांनी फोडून लाकोंचा माल लंपास केला. आंदाजे १८ तोळे सोने, १० तोळे चांदी, व ३० हजार रुपये लंपास केले. रविवार दी:२२ रोजी घरमालक महावीर मलाप्पा कुगे व सर्वजण बाहेर गेले असता चोरट्यांनी सर्व माल घर फोडून लंपास केले. घरमालक महावीर म्हणाले, नातेवकानी फोन करून सांगताच आम्ही हजर झालो असे म्हणले. आम्ही घरात न जाताच सदलगा पोलिस स्टेशन ला कळवले.
घटनास्थळी ए. एस. आय. सुरेश हूनगर, ए.एस.हुंजी, अजित आस्की, यांनी पाहणी केली. चोरीचा विषय मोठा आहे असे समजताच पोलिसांनी बेळगांव येथील श्वान पथक व ठसे तज्ञांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी श्वान पथक सायंकाळी ४ वा. हजर होऊन सर्व तपासणी केली. या घटनेने बेडकिहाळ व शमणेवडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. या आधी देखील बेडकिहाळ व शामनेवडी परिसरात चोरीचे अनेक प्रकरण समोर आले आहेत. त्यामध्ये पोलिसांना यश आले आहे.