दिव्यांगाना कोणतीही मदत करण्यास मी मागे हटणार नाही.


 दिव्यांगांना कोणतीही मदत करण्यास मी मागे हटणार नाही -  नगरसेवक अब्राहम बापू आवळे

PRESS MEDIA LIVE  :  इचलकरंजी : आनंद शिंदे :

 प्रहार दिव्यांग संघटना उदघाटन समारंभ इचलकरंजी येथे कै.किसनराव आवळे मंगल कार्यालय येथे पार पडला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अब्राहम आवळे होते. धडधाकट माणसाला कोणी मदत करू शकेल परंतु अपंगाला मदत करणे म्हणजे एक सामाजिक बांधिलकी असे मी समजतो म्हणून अपंगांचे कोणतेही शासन दरबारी व इचलकरंजी नगरपालिकेच्या निधी करता त्याच बरोबर प्रहार अपंग संघटनेला ऑफिससाठी नगरपालिकेकडून जागा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करीन. प्रहार अपंग संघटनेचे शहराध्यक्ष श्री सुनील पाटील यांनी संघटनेचा आढावा थोडक्यात मांडला. संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री देवदूत माने  यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की *आम्ही सर्वजण ज्यांना ह्रदय स्पर्श मानतो व आमचे आधारस्तंभ या राज्याचे मंत्री नामदार बच्चू कडू.* या राज्यांमध्ये शेतकऱ्याचे व अपंगांचे वेदना व तळमळ जानणारा आणि न्याय देणारा असा नेता.

मी व माझे सहकारी या संघटनेचे गेले पंधरा वर्षा पासून प्रहार संघटनेचे काम करीत आहोत. अपंगांच्या वर बरेच अन्याय झाले आहेत,होत आहेत त्यावर कशा पद्धतीने मात करून अपंगांना न्याय देण्याचे काम प्रहार संघटना च्या माध्यमातून आम्ही या जिल्ह्यामध्ये करीत आहोत. त्याच बरोबर लवकरच जिल्ह्यात व इतरही शहरांमध्ये प्रहार संघटनेचा विस्तार होईल. अपंगांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे म्हणून सर्वांना न्याय द्यायचे काम करत आहोत. या कार्यक्रमास सामाजिक नेते शरद बोंद्रे व मोठ्या संख्येने अपंग महिला पुरुष हजर होते.


1 Comments

Previous Post Next Post