कोरोना योद्धांनसह धन्वंतरीचा सांगलीत सत्कार.


 धोका टळला नसल्याने कोरोना बाबत सतर्क राहणे गरजेचे : ना. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर.

कोरोना योद्धांसह धनवंतरीचा सांगलीत सत्कार.

PRESS MEDIA LIVE :  सांगली-

रुग्णसंख्या घटत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोनासारख्या महामारीचा धोका टळत असल्याचे चित्र दिसून येत असली तरी जोपर्यंत लस उपलब्ध होत  नाही तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक असल्याची अपेक्षा आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोरोना योद्धांच्या गौरव समारंभ प्रसंगी सांगलीत व्यक्त केली

  वीर सेवादल मध्यवर्ती समिती व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वी.बाबासाहेब कुचनुरे यांच्या 66 व्या जन्म जयंती निमित्त कोरोना संक्रमण काळात सेवाभावी वृत्तीने कोविड सेंटरची उभारणी, संचलन करणाऱ्या समाज सारथींचा आणि नीरामय सेवा देणाऱ्या धन्वंतरीचा कोरोना योद्धा सन्मान गौरव समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते

    समारंभाच्या अध्यक्षस्थानी वीर सेवादल मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष वीराचार्य पतसंस्थेचे चेअरमन शशिकांत राजोबा होते 

प्रथम वीराचार्य बा. कु. यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले

ना. डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दक्षिण भारत जैन सभेचे उद्योजक भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमंत्री डॉ. अजित पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, स्वाभिमानीचे संजय बेले व तसेेच डॉ. रवींद्र वाळवेकर, डॉ. अनिल मडके, डॉ. राहूल रुगे, डॉ. श्रद्धा बेले, डॉ. दिपाली चौगुले,डॉ.अभिनंदन आडमुठे यासह पदाधिकाऱ्यांच्या व भगवान महावीर कोविड सेंटर सांगली, स्वाभिमानी कोविड सेंटर समडोळी, कर्मवीर कोविड सेंटर दुधगाव येथील कोविड सेंटरच्या माध्यमातून केलेल्या सेवेबद्दल व विशेष योगदानाबद्दल धन्वंतरीचा ही गौरव करण्यात आला

ना. यड्रावकर म्हणाले की सेवावृत्तीने केलेल्या कार्यामुळे कोरोनाची टळण्यास हातभार लावण्यात शासकीय रुग्णालय, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील डॉक्टर्स, नर्स वॉर्डबॉय यांच्यासह कोविड प्राथमिक उपचार केंद्राची उभारणी करणाऱ्या कोरोना योद्धाचे काम मोलाचे ठरलेले आहे तथापि जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने स्वतः आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

 यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमंत्री डॉ. अजित पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले धन्वंतरीच्या वतीने डॉ. अनिल मडके यांनी यथोचित सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

अध्यक्षस्थानावरून बोलताना शशिकांत राजोबा यांनी वीराचार्य  बाबासाहेब कुचनुरे यांच्या कार्याचा गौरव केला समाजाला चांगली दिशा देण्याचे काम केले आहे  वीराचार्य व चिन्मयसागरजी महाराज यांच्यामुळेच आज जैन समाजाला जनसामान्यांमध्ये मानाचे स्थान असल्याचे सांगून त्यांनी कोरोना काळातील धन्वंतरीच्या निरामय वृत्तीच्या सेवेला त्रिवार प्रणाम करून त्यांना शतशः धन्यवाद दिले यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमंत्री डॉ. अजित पाटील वीराचार्य पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत राजोबा, उपाध्यक्ष जयकुमार बेले, संचालक अरुण पाटील, मोहन नवले,अरुण कुदळे, डी के पाटील, व्यवस्थापक शीतल मसुटगे, अनिल भोकरे यांसह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते मोहन नवले यांनी स्वागत केले, एन जे पाटील यांनी प्रास्ताविक केले तर संचालक अजित भंडे यांनी आभार मानले


 संकटाना तोंड देण्यासाठी यंत्रणा सतर्क 

कोरोनाचे  संकट टळण्यासारखी परिस्थिती जाणवत असली तरी धोका कमी झाल्याचा भ्रमात कुणीही राहू नये ,गाफीलपणामुळे कोरोनाचे संकट पुन्हा येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यासाठी ही आरोग्य यंत्रणा सतर्क असल्याची ग्वाही ही आरोग्य राज्यमंत्री ना. डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला.



 

फोटो ओळी

सांगली : कोरोना काळात कोविड सेंटरच्या माध्यमातून विशेष योगदान दिल्याबद्दल कोरोना योद्धा यांचा सत्कार करताना आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह मान्यवर

फोटो ओळी

सांगली : कोरोना योद्धा व धन्वंतरीच्या सन्मान समारंभा प्रसंगी बोलताना ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर बाजूस शशिकांत राजोबा, भालचंद्र पाटील, रावसाहेब पाटील आदी

Post a Comment

Previous Post Next Post