स्वारगेट पोलिसांकडून एक वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
पुणे – एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्यावर विनयभंग व हाणामारीचे गुन्हे दाखल होते. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. सुलतान करीम शेख ( रा. गुलटेकडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जायभाय, पोलीस शिपाई ज्ञाना बडे, मनोज भोकरे,सचिन दळवी, विजय कुंभार, शंकर गायकवाड हे गस्त घालत होते. तेव्हा ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना एक वर्षापासून फरार असलेला शेख हा इंदिरानगर येथील समाज मंदिरात येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.