' ईद- ए - मिलाद ' साधेपणाने साजरी करण्यात आली.
पिंपरी - पिंपरी शहरामध्ये शुक्रवारी (दि. 30) 'ईद-ए-मिलाद' साधेपणाने साजरी करण्यात आली. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक न काढता घरोघरी नमाज आणि कुराण पठण करून मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली.
दरवर्षी ईद-ए-मिलादनिमित्त उत्साह पाहण्यास मिळतो. मुस्लिम बांधवांकडून मशिदीत जाऊन नमाज पठण केले जाते. त्याशिवाय, मिरवणूक (जुलूस) काढण्यात येते. सरबत, पाण्याच्या बॉटल आदींचे वाटप केले जाते. त्यामुळे ईदच्या दिवशी उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असते. धर्मगुरूंचे प्रवचन होते. मात्र, यंदा करोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या ईदनिमित्त मिरवणुका न काढता मुस्लिम बांधवांनी साधेपणाने ईद साजरी केली. घरोघरी तांदळाची गोड खीर करण्यात आली होती. त्याशिवाय, घरोघरी नमाज पठण, कुराण पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दूरध्वनीद्वारे आणि सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
यावर्षी ईद-ए-मिलाद जुम्माच्या दिवशी आली होती. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये आनंद होता. परंतु करोनामुळे प्रार्थनास्थळे बंद असल्याने मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करून ऐकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच पाहुणेमंडळींना, मित्रांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सर्वांनी ईद साजरी केली.
- अकबर इनामदार, भोसरी
डिजिटल प्रेस मीडिया लाईव्ह.