व्हॉट्सअँप आता सुरू करणार व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग सेवा.
PRESS MEDIA LIVE :
नवी दिल्ली । सोशल मीडियात व्हॉट्सअॅप हा अगदी लोकप्रसिद्ध अॅप म्हणून ओळखला जातो. फोटो, डॉक्यूमेंट्स आणि व्हिडिओची देवाण-घेवाण करण्यासाठी जनता व्हॉट्सअॅपचा वापर करीत असतात. जगभरातील सुमारे 228 कोटी लोकं या अॅपचा वापरकर्ते आहेत. त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या आवडी-निवडीसाठी व्हॉट्सअॅप नेहमीच त्यात बदल करत असते. गेल्या काही दिवसांपुर्वी वापरकर्त्यांनी कंपनीला फिडबॅक देत; व्हॉट्सअॅपमध्ये व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. त्यामुळे आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपचाने एक मोठा बदल केला आहे. आता व्हॉट्सअॅप कॉल करतांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगची सेवा वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे.
त्यासाठी वापरकर्त्यांना 'क्यूब' हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतरच ग्राहकांना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करता येणार आहे.
असे करा व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग
गुगल प्ले स्टोरवरून वापरकर्त्यांना 'क्यूब कॉल रिकॉर्डिंग' हे अॉप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर अॅप ओपन केल्यानंतर ज्या व्यक्तीची व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंग करायची आहे त्याला कॉल करावे लागणार आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या स्क्रिनवर आपल्याला 'क्यूब कॉल व्हिजिट' असा पर्याय आला असेल तर, याचा अर्थ कॉल रिकॉर्डिंग होत आहे. जर असे पर्याय येत नसेल तर आपल्याला पुन्हा क्यूब अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन Force Voip हे पर्याय सुरु करावे लागणार आहे. त्यानंतरच वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल रिकॉर्डिंगचा आनंद घेता येता आहे. मात्र कंपनीने सांगितले आहे की, न सांगता कोणाची रिकॉर्डिंग करणे हा गुन्हा असून, समोरच्या व्यक्तिला सांगूनच आपण कॉल रिकॉर्ड करावे असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.