संजीवकुमार गायकवाड यांची निवड.


 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख पदी दैनिक हिंदू सम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार संजीवकुमार एस. गायकवाड यांची निवड

 PRESS MEDIA :

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख पदी दैनिक हिंदू सम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार संजीवकुमार एस. गायकवाड यांची निव ड

नांदेड:श्री.संजीवकुमार गायकवाड गेल्या 20 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात जनसामान्यांचा आवाज म्हणून उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी बऱ्याच व्रतपत्रात काम केले आहे. त्यांचे शिक्षण माध्यम शाश्त्र मध्ये झाले आहे.त्यांच्या अनुभवाचा संघटनेसाठी चांगलाच फायदा होणार आहे.त्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.डी.टी.आंबेगावे सरांनी श्री.संजीवकुमार एस गायकवाड यांची नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड केली आहे.

संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघटना बळकटीकरिता कार्य करणार असून संघटनेची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष सहकार्य करणार आहेत. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री. विष्णू अष्टीकर,मराठवाडा कार्याध्यक्ष श्री.हुकुमत मुलाणी, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री.सुर्यकांत तादलापूरकर,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.विशाल पवार यांच्या सुचनेनुसार संस्थापक अध्यक्ष व राज्य कार्यकारिणीच्या एकमताने ही निवड जाहीर करण्यात येत आहे.यांच्या या निवडी मुळे जिल्यातील त्यांच्या पत्रकारांमध्ये नवचेतन्य निर्माण झाले असुन त्यांच्या या निवडीचे मिलींद कवलगावकर,राजू तडखेलकर,गंगाधर सोनकांबळे बिलोली,वालिओद्दीन फारुकी,माहूरचे मनोहर खंदारे,राज गाडेकर,उद्धव मांमडे उमरी,मुखेडचे रणजित गवळे,गोविंद पाटील तोरणे, शिवराज कांबळे,अजय एडके,समस्त मित्र मंडळ या सर्वांनी स्वागत व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post