बेडकिहाळ कर्नाटक :

 बेडकिहाळ येथे सीमाभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली कोवीड योध्दा पत्रकारांचा सन्मान पुर्वक गौरव करण्यात आला...



PRESS MEDIA LIVE : बेडकिहाळ : विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :

बेडकिहाळ येथे कुसुमावती मिर्जे कालेज हॉलमध्ये सीमाभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार कोरोना योध्दाना व पोलीस उपनिरीक्षक आर.वाय.बीळगी सदलगा यांना सुध्दा कोवीड योध्दा म्हनुन सन्मानपूर्वक सन्मानचिन्ह,शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी माध्यम व चॅनेलच्या सहकार्यातुन घरोघरी बातमी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे सतत संदेश देत राहिले. गेल्या सात महिन्यांपासून या पत्रकार कोरोना योध्यांचे व पोलीस अधिकार्यांचे फार मोठे योगदान कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोलाचे ठरले आहे. असे आपल्या मनोगतामध्ये सीमाभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांनी त्यांचे कौतुक केले.    

   तसेच आरोग्य खात्यातील अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्तेंचा सुध्दा  विक्रम शिंगाडे यांनी कौतुक केले. तसेच प्रा.डी.एन. दाभाडे यांनी सुध्दा पत्रकार हा समाजाचा तिसरा खांब असून सरकारने अशा योध्दांना मानधन व सरकारी सवलती प्रथम त्यांना द्यायला पाहिजे. कारन स्वता घराच्या बाहेर असुन स्वताचा जीव धोक्यात घालून जनतेला सतर्क राहन्यासाठी चॅनेल व माध्यमाच्या स्वरुपामध्ये सेवा करीत असतात.  सरकाराने यांची दखल घेणे गरजेचे आहे असे म्हनाले. 

     सदलगा पोलिस स्टेशनचे पी.एस.आय.आर.वाय.बीळगी यांनी आपल्या मनोगतात सीमाभाग पत्रकार संघाचे भरभरून कौतुक करून या पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांचे आदर्श घेन्यासारखे कार्य आहे. समाजामध्ये अशा योध्दांचा गौरव होने हे अत्यंत महत्त्वाचे आहे .  गौरव करणे म्हणजे हे एक प्रेरना देन्याचे कार्य आहे असे म्हनाले.   या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हनुन पी.बी.शिलवंत उपतहशिलदार हे होते. व मुंबई पालघर च्या पी.एस.आय.कु.अनुराधा पाटील ह्या प्रमुख पाहुणे म्हणून होत्या.  कोरोना योध्दांचे कार्य गौरवास्पद आहे म्हनुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  व विशेष अतिथी म्हणून बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश रोकडे, कु.उत्कर्षा हेगडे, मुख्याध्यापिका निपाणी ह्या होत्या. त्या आपल्या मनोगतामध्ये म्हनाल्या की सीमाभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांच्या सारखे कार्य करणारे प्रत्येक घराघरात असावे असे मला वाटते. असे म्हनुन संघाचे व पत्रकारांचे मनभरून कौतुक केले.  विक्रम शिंगाडे हे सामाजिक, शैक्षणिक क्षैत्रामध्ये अनेक उपक्रमांचा माध्यमातून सदैव कार्यरत असतात. असे त्या म्हणाल्या. बेडकिहाळ, निपाणी,कब्बुर, शंकेश्वर चिकोडी, नागराळ, शमनेवाडी येथील पत्रकारांना शाल, श्रीफळ, व सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांनी केले. व सुत्रसंचलन प्रिती हट्टीमणी तर आभार नेताजी गोरे यांनी मानले.

    या कार्यक्रमासाठी सौ.सुगंधा पुराणिक, सुरेश दरेकर, संपत बोरगल,अशोक नारे, शिरीष कांबळे,  जीवन यादव, अमोल जाधव, रुपेश सनदी, विजय माळगे, आदीनाथ कांबळे, अशोक यादव,  रमेश जोगदंडे, व संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post