PRESS MEDIA LIVE : पुणे :
राज्यस्तरीय बचत गट परिषद- 2020
देशाच्या विकासामधे महिलांच योगदान खूप मोलाच आहे- डॉ श्री प्रशांत खांडे
"बचत गट ....महिला विकास" राज्यस्तरीय बचत गट परिषद संपन्न दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी पुणे संपन्न झाली.
कोरोना संकटात, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हि परिषद ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली.
स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि विविध सहयोगी संस्थांच्या योगदानाने हि सरपंच परिषद अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
परिषदेत सर्वाचे स्वागत आणि प्रस्तावना स्पार्टबन सोशल वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया चे चेअरमन डॉ श्री. प्रशांत खांडे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी, "देशाच्या विकसमध्ये माहीलाचा सहभाग खूप मोलाचा आहे, तसेच सामाजिक बांधिलकी आणि महिला आर्थिक विकास करण्यासाठी बचत गट मोलाची भूमिका बजावत आहेत, हे त्याचे मत त्यांनी स्पष्ट पणे मांडले.
सकाळी १० वाजता सुरु झालेल्या या राज्यस्तरीय बचत गट परिषदेत तज्ञ मार्गदर्शक राणी पाटील, सुनीता मोडक, छाया काकडे, प्रणोती शितोळे, सुजाता सावंत, शामला देसाई यांनी मार्गदर्शन केले. बचत गट कसा सुरू करावा, विस्तार कसा करावा, महिला सक्षम कशा होतील, बचत गट उत्पादनाचे मार्केटिंग कसे करावे, कोणते बचत गट सुरू करावे, असे विविध विषय श्रोत्यांना एक नवा विचार देऊन गेले.
परिषदेत काही अनुभव कथनं सादर झाली. केवळ विचार करून बचत गट विकास होत नाही तर त्यासाठी कृतीपन करावीच लागते हे त्यातून स्पष्टा झाले. अभिजीत, चित्रा मॅडम, सचिन शेवाळे असे प्रत्येकाने आपल्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव व त्यातील येणारे अडथळे पार करून कशा पद्धतीने काम यशस्वी केले हे सर्व उपस्थितांना समजून सांगितले.
बचत गट परिषद यशस्वी करण्यासाठी फेडरेशन कोअऱ टिम सदस्य प्रीती काळे व निर्मल ठाकूर यांनी सूत्र संचलन आणि वर्षा खांडे यांनी आभार प्रदर्शन केले. कपिश कोसळगे आणि मयूर बागुल यांनी सर्व ऑनलाईन सुत्रे समर्थपणे हाताळली. सदरील परिषद घेण्यासाठी सर्व सहयोगी संस्था त्यात भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ, उदयकाळ फाउंडेशन, जिओ फाउंडेशन, अखिल रयत क्रांतीकरी संघ, महात्मा फुले समाज सेवा मंडळ, व रयत सेवक एजुकेशनल अँड मल्टीपर्पाज सोसायटि यांनी सहकार्य केले. तसेच फेडेरेशनच्या सर्वच कोअऱ टिमचे मोलाचे सहकार्य या परिषदेच्या आयोजनात लाभले आहे.