अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रश्न मंजुषा स्पर्धेत यश.
सुफियान शेख,अमन लांडगे यांनी जिंकली 'स्पोर्ट्स इंडी' क्विझ
PRESS MEDIA LIVE : पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुलमधील सुफियान शेख,अमन लांडगे या विद्यार्थ्यांनी 'स्पोर्ट्स इंडी' क्विझ मध्ये विजेतेपद पटकावले. मुंबईच्या 'स्पोर्ट्स इंडी' या संस्थेने ही ऑन लाईन प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.ए. इनामदार,प्राचार्य परवीन शेख,'स्पोर्ट्स इंडी' संस्थेच्या संचालक सुप्रिया बडवे यांनी अभिनंदन केले.
Tags
Latest News .Pune.