पुण्यात खासगी हॉस्पिटल कडून जादा बिल आकारणी सुरूच.
खासगी हॉस्पिटल्स नियमांना जुमानत नसल्याचा प्रकार.
PRESS MEDIA LIVE : पुणे मोहम्मद जावेद मौला :
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील खासगी हॉस्पिटलकडून अजूनही वाढीव बिले करोना रुग्णांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरुच आहे. शासनाने खासगी रुग्णालयांना नियमानुसार बिले आकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरी, खासगी हॉस्पिटल्सकडून जादा बिले आकारली जात आहे.
मागील आठ दिवसांत खासगी हॉस्पिटलने 67 लाख 63 हजार 989 रुपयांचे जादा बिल समाविष्ट केल्याचे समोर आले आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत 2 कोटी 23 लाख 90 हजार 827 वाढीव बिलाची रक्कम कमी करण्यात आली आहे.
Tags
Latest News .Pune.