माणुसकी च संपली


 खरंच या कोरोना मुळे माणसातली माणुसकीच संपली.

PRESS MEDIA LIVE : पुणे ;

पुणे : पुण्यात सायरन वाजणं बंद झालय, आता आवाज येतोय फक्त अॅम्ब्युलन्समधून जे हृदय शेवटची घटका मोजतय त्याच्या ठोक्यांचा..., मला वाचवा, मला वाचवा या किंकाळ्यांचा.... कोणाला ऑक्सिजन मिळत नाहीतर कोणाला हॉस्पिटलवाले भरती करून घेत नाहीत. तर कोणाला तुझा मेडिक्लेम आहे का असा प्रश्न विचारून तासन्- तास हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णाला मृत्यूच्या दारातून बाहेर येण्यासाठी धडपड करावी लागत आहे. तर कोणाकडे पैसे नसल्याने तो घरीच तडफडून मृत्यू पावतो आहे. पुणे शहरात कोविड सेंटरमध्ये उभारण्यात आलेली शौचालये स्वच्छ नाहीत.प्यायला पुरसे पाणी नाही, सॅनिटायझरची कमतरता आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी या डॉक्‍टरांनी केल्या आहेत. या डॉक्‍टरांना समजावताना आधिकारी औषधे लवकरच मिळतील. सध्या आहे त्या परिस्थितीत मॅनेज करा असा सल्ला देत आहेत. काही औषधांची कमतरता केवळ पुण्यातच नव्हे तर देशभरात आहे. आम्ही प्रयत्न करीत आहोत. महापालिकेकडून ही सारी औषधे मिळत नाहीत. त्यांच्याकडेही औषधांचा तुटवडा असल्याचे या आधिकाऱ्यांनी सांगितले. डॉक्‍टरकडून अडचणींचा पाढा वाचला जात असताना आधिकारी फक्त प्रयत्न सुरू आहेत. औषधे लवकरच मिळतील, असे सांगत आहेत. सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसतील तर रूग्णांना काय उपचार मिळणार अशी स्थिती असल्याने या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रूग्णांचे नातेवाईक पुरते धास्तावले आहेत.

रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये दहशत.

राज्याची आरोग्य व्यवस्था तर बोलायलाच नको..ही परिस्थितीत फक्त पुण्यात नाहीतर देशभर झाली आहे. तरी बेजबाबदारपणे शासक वर्ग वागत आहे. का त्यांना त्यांची जबाबदारी कळत नसेल, यामध्ये नेमकं दोषी कोण, याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आज महाराष्ट्र व देशातील जे चित्र आहे. ते अतिशय वेदनादायी आहे. कोणताही पक्ष, कोणताही लोकप्रतिनिधी देशात कोरोनाने मृत्यूचे थैमान घातला असताना त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी अनावश्यक गोष्टीकड़े लोकांचे लक्ष वळवत आहेत. नाही त्या प्रकरणाला उथळ करून नागरिकांचा एका म्हणीप्रमाणे टांगा पलटी... घोडे फरार असा प्रकार चालू केला आहे. देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे . लोकांचं जगणं रस्त्यावर आले आहे. करोडोंच्या संख्येने नागरिक उपाशीपोटी झोपत आहे. तरुणांना उद्याच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे . ज्येष्ठ नागरिकांचे हाल तर विचारायलाच नको .... खरच या कोरोना  मुळे माणसातली माणुसकीचं संपली.

Post a Comment

Previous Post Next Post