अखेर फॅशन स्ट्रीट मार्केट मधील व्यवसायिकांनी बोर्डाच्या परवानगीविनाच बाजारपेठ खुली केली.
PRESS MEDIA LIVE : पुणे :( मोहम्मद जावेद मौला) :
कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित होता. अखेर फॅशन स्ट्रीट मार्केटमधील व्यावसायिकांनी बोर्डाच्या परवानगीविनाच बाजारपेठ खुली केली आहे. मार्केटमधील 30 टक्केच दुकाने खुली करत सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून, याठिकाणी व्यवसाय करणार असल्याची ग्वाही व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे.
राज्य सरकारने लॉकडाऊन नियम शिथिल करत, बाजारपेठा उघडण्यास परवानगी दिली आहे. बोर्डाकडून अद्याप ही परवानगी मिळालेली नाही. करोनासंसर्गाचे कारण देऊन बोर्ड बैठक घेण्यास टाळाटाळ करत आहे. मात्र, व्यावसायिकांसमोरील अर्थिक संकट लक्षात घेता, बाजारपेठा खुल्या होणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही राज्य सरकारच्या परवानगीच्या आधारावर फॅशन स्ट्रीट मार्केट चालू केले आहे. याठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करणार असल्याचे फॅशन स्ट्रीट व्यापारी असोसिएशनचे प्रमुख भगत तौर यांनी सांगितले.
Tags
Latest News .Pune.