भीमा कोरेगाव दंगलची एसआयटीमार्फत चौकशी करा
कबीर कला मंचचे शाहीर सागर गोरखे ज्योती जगताप रमेश गायचोर यांची तत्काळ सुटका करा.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
भीमा कोरेगाव दंगलीस जबाबदार धरून बेकायदेशीररित्या अटक केलेल्या वरील कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करावी.
सदर दंगलीस जबाबदार असणाऱ्या मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे या खऱ्या आरोपींना तत्काळ अटक करावी.
भीमा कोरेगाव प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या सर्व मानवाधिकार कार्यकर्ते, विचारवंत,वकील आणि कलाकार यांची बिनशर्त सुटका करण्यात यावी.
भीमा कोरेगाव प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत एस.आई.टी.ची तत्काळ स्थापना करण्यात यावी.या साठी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.यावेळी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, स्वराज अभियान इब्राहिमखान, रिपब्लिकन भारत आकाश साबळे, अखिल महाराष्ट्र कामगार संघटना किशोर कांबळे, सिद्धार्थ दिवे, कबीर कला मंचचे रामदास उन्हाळे, भीमशाही युवा संघ नितीन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शाहरुख खान, असलम बागवान, राज फैय्याज, एडवोकेट क्रांती सहाने, एडवोकेट तैसीफ शेख, क्रांतिसूर्य संघटना शुभम जगताप, नितीन जगताप, अक्षय साळवे, विशाल भालेराव सहित शेकडो कार्यकर्त्यांनी अटकेच्या विरोधात निदर्शने केली.
*भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान पुणे,*