सामूहिक प्रयत्नांची गरज. अभिनेते सयाजी शिंदे.


कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : अभिनेते सयाजी शिंदे                                                                                              कोरोना किलर ' उपकरणाचे मुंबईत लोकार्पण                                                                             मुंबई संपर्क कार्यालयाचे सयाजी शिंदे यांच्या हस्ते उदघाटन

PRESS MEDIA LIVE : पुणे :

'कोरोना विषाणू साथीपासून समाजाचे होणारे नुकसान अभूतपूर्व असून कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे . आयनायझेशनच्या माध्यमातून  भोवतालचे वातावरण कोरोना मुक्त करणारे 'कोरोना किलर ' उपकरणासारखे संशोधन याकामी उपयुक्त ठरेल ',असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. 

सयाजी शिंदे यांच्या हस्ते 'कोरोना किलर ' उपकरणाचे मुंबईत गोरेगाव येथे लोकार्पण करण्यात आले. यासाठीच्या संपर्क कार्यालयाचे सयाजी शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

पुण्यातील  इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा ली ,एस ए एस लाईफ -ई ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्या या संपर्क कार्यालयातून कोरोना विषाणू पासून बचावासाठी घेण्याची काळजी आणि 'कोरोना किलर ' संशोधनाची माहिती देणारी  राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. 

यावेळी श्रद्धा विचारे (चेअरमन ,लाईफ - इ -ऑरगॅनिक )सविता गावंडे (संचालक ,सहयोग क्रिएशन ),रवींद्र आंबेकर(चीफ एडिटर,मॅक्स महाराष्ट्र) ,ब्रिजेश भाटला(फार्मा इंडिया ),अमित दीक्षित (फार्मा इंडिया) हे मान्यवर उपस्थित होते.  

कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंतू ,असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान  व मशीन  इलेक्ट्रोनिक इंजिनियर असलेल्या आणि  इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असलेल्या भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण  व संशोधन विभागाने ह्या  मशीनची कार्यक्षमता चाचणी प्रमाणित केली आहे . 

 व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण  हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही  हवा पोहोचते  तेथे हे आयन पोहचतात व  कोरोना व्हायरस आणि  इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले.आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी 'कोरोना किलर ' विषाणू नाशक   इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली  कार्यक्षमता  चाचणी प्रमाणपत्र यावेळी   देण्यात आली .  पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि .या कंपनीने संशोधित केलेले आणि  अशा स्वरूपाची प्रमाणपत्र  मिळवणारे हे पहिले उपकरण आहे ,असे भाऊसाहेब जंजिरे यांनी यावेळी सांगितले. 

  'कोरोना किलर ' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते .  रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते. 

 उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय,  शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच  या संस्थेने बसविले आहे,उप मुख्य मंत्री अजित पवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे ,अशी माहिती यावेळी देण्यात आली   .                                                                     

Post a Comment

Previous Post Next Post