शिबिरास प्रतिसाद.



एम. सी.ई सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कुल मध्ये 'विपश्यना विशोधन विन्यास' शिबिरास  प्रतिसाद

PRESS MEDIA LIVE : पुणे :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लीश मिडियम स्कुल आणि अबेदा इनामदार  कॉलेज च्या वतीने आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व 'माईंड इन ट्रेनिंग फॉर राईट अवेअरनेस ( 'मित्र') या आनापान साधना वर्ग आयोजित करणाऱ्या संस्थेच्या संयुक्त विदयमाने २४ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यात आलेल्या  ' विपश्यना विशोधन विन्यास' शिबिरास उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला .

 शिक्षण संचालक दिनकर पाटील  यांनी रोजच्या जीवनात आनापान साधना किती महत्वाची आहे हे सविस्तर समजावून सांगितले, ही सवय लहानपणापासुनच विद्यार्थ्यांच्या जीवनात लावल्यास त्यांच्या वागण्यात व अभ्यासात आमुलाग्र बदल घडुन येतात हे प्रात्यक्षिकासह समजावून सांगण्यात आले . 

या शिबिरास शाळेतील सुमारे ८० पेक्षा जास्त शिक्षकांनी सहभाग नोंदवला या शिबिरास शाळेचे प्राचार्य डॉ. इब्राहिम जागिरदार हेही उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.                                                                                                               www.pressmedialive.com                            

Post a Comment

Previous Post Next Post