समाजकार्य पदवीधर मंडळाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी मयुर बाळकृष्ण बागुल यांची निवड
PRESS MEDIA LIVE : पुणे :
महाराष्ट्रातील व्यवसायिक समाजकार्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना व विद्यार्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असते. मागील पाच वर्षापासून हे कार्य सुरु होते त्याला मूर्त स्वरुपात संघटनात्मक दिशा देण्याचे काम व न्याय मिळवून देण्यासाठी समाजकार्य पदवीधर मंडळाच्या माध्यमातून समाकार्य क्षेत्रात कार्य करत आसताना कार्यकर्त्याला संस्थेत निर्माण होणाऱ्या समस्या सोडवणे, एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर लोकशाही मार्गाने लढा देऊन त्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळवून देणे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतिरीक्त फी वाढी विरोधत कॉलेज प्रशासन किंवा विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कमी करणे असे अनेक प्रश्न या समाजकार्य पदवीधर मंडळाच्या वतीने सोडविण्याचे कार्य केले जातात. प्रशासकीय सेवेत जिथे व्यवसायिक समाजकार्य क्षेत्रातील विद्यार्थांना डावलून पद भरती केले जात असतील तिथे प्रशासन यांना पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे.
मयुर बाळकृष्ण बागुल यांचे आजपर्यंत केलेले सामाजिक एम.एस.डब्ल्यू व बी.एस.डब्ल्यू या विद्यार्थ्यांसाठी कार्य व सेवा पाहता त्यांचा कार्याची दखल घेऊन समाजकार्य पदवीधर मंडळ महाराष्ट्र संघटनेच्या सर्व पदधिकारी यांच्या विचारविनियमाने प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ही निवड व्यवसायिक समाजकार्य क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहून पदाला न्याय देण्याचे काम केले जाईल.
अभिनंदन मयुर
ReplyDelete