पुणे मनपा आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली.


पुणे मनपा आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली.

PRESS MEDIA LIVE  :. पुणे ( मोहम्मद जावेद मौला)

केंद्र आणि राज्य सरकारने आणखी काही क्षेत्रांवरील निर्बंध शिथिल केले असले तरी पुणे महापालिकेने मात्र ते शिथिल केले नाहीत. दि.30 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्‍लासेस, शिक्षण संस्था बंदच राहणार असून, रेस्टॉरन्ट, जीम, सिनेमाहॉल, धार्मिक स्थळे, मनोरंजन पार्क, जलतरणतलाव, सभा संमेलने आदी बंदच ठेवली जाणार आहेत.

केंद्र आणि राज्याने लॉकडाऊनमध्ये शिथीलता देताना काही मेट्रो आणि अन्य वाहतुकीला परवानगी दिली आहे. याशिवाय नववी ते 12 पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांशी पालकांच्या आणि शाळेच्या समन्वयाने शिक्षण घेता येणार आहे. मात्र, महापालिकेने हे निर्बंध कायम ठेवले आहेत. याशिवाय हॉटेल्स, जीम, जलतरण तलाव, धार्मिक स्थळे यांनाही सुरू करण्याला परवानगी दिली नाही. या शिवाय दि. 3 सप्टेंबरपासून, सार्वजनिक वाहतुकीमध्ये बससेवा सुरू करण्याला परवानगी दिली आहे. मात्र त्याच्या चलनवलनासंबंधी स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

फिजिकल डिस्टन्सिंग आणि अन्य सुरक्षेच्या नियमांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नसून, ते नियम जैसे थेच आहेत. अधिकाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्‍यक असून, अन्य कर्मचाऱ्यांची 30 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. खासगी आस्थापनांना देखील 30 टक्के उपस्थिती ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post