सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या व्यवसायिकांवर मनपा कडून कारवाई होणार.
PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला.
पुणे – सरकारने अनलॉकचा निर्णय घेताना करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीही जाहीर केली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेने कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार केली असून त्यांच्याकडून बुधवारपासून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरांतील दुकानांमध्ये तसेच मॉलमध्ये सोशल डिस्टिसिंग पालन न होणे, सॅनिटायझरचा वापर न करणे, यासारख्या तक्रारी वाढत असून त्यासाठी कारवाई करण्यास अतिक्रमण आणि घनकचरा निमर्लून विभागाचे कर्मचारी व्यावसायिकांवर कारवाई करणार आहे, अशी माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.