टीवी 9 चे रिपोर्टर पांडूरंग रायकर यांचे कोरोना मुळे निधन.
राज्यसरकारने पत्रकारांच्या सुरक्षा बाबत ठोस पाऊल उचलण्याची गरज. अंजुम इनामदार.
PRESS MEDIA LIVE : पुणे
पुणेः येथील तरुण तडफदार टीवी 9 चे रिपोर्टर पांडूरंग रायकर यांचे नुकतेच कोरोना मुळे निधन झाले. अत्यंत धाडसी, निर्भिड पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती. प्रसंग कसलाही असो, बातमीच्या तळापर्यंत कसे पोहचायचे हे त्यांना चांगले माहीत होते. पण त्यांच्या आकस्मिक जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सर्वत्र कोरोना सारख्या महाभयानक परिस्थिती असताना देखील रायकर यांनी आपल्या जीवाची पर्वा कधीच केली नाही. जनते समोर सत्य परिस्थिती योग्य रित्या मांडण्याचे काम पांडूरंग रायकर यांनी केले. पण म्हणतात ना जो आव डे सर्वांना तोची आवडे सर्वांना.
या बाबत अंजुम इनामदार यांनी सरकार वर ताशेरे ओढले. पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत असतात त्यांच्या सुरक्षचे काय ? कोणत्याही प्रकारचे सुरक्षा पत्रकारांना मिळताना दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकार ने पत्रकारांच्या समस्येबाबत त्यांच्या अडचणी बाबत गंभीरतेने विचार करावा असे स्पष्ट परखड मत अंजुम इनामदार यांनी मांडले.