मनपा रुग्णालयातील कोरोना बाधित..


मनपा रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी यांच्या नाष्टा , जेवणाचा खर्च एक कोटीचा.

PRESS MEDIA LIVE :  पिंपरी :

पिंपरी – महापालिका रुग्णालयातील करोनाबाधित रुग्ण, डॉक्‍टर व कर्मचारी यांना दोन वेळचे जेवण व नाश्‍ता पुरविण्यात येतो. त्यासाठी शहरातील विविध 15 संस्था व संघटनांकडून पुरवठा करण्यात येतो. पुरवठाधारकांकडून पुरविण्यात येणाऱ्या या आहारावर महिनाभराच्या कालावधीत तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून करोना विषाणूचे संक्रमण सुरू आहे. करोनाबाधित रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम, भोसरी व जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्‍टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना दोन वेळचे जेवण व नाश्‍ता देण्यात येतो. त्यासाठी शहरातील 15 पुरवठाधारकांकाडून जेवण व नाश्‍ताचा पुरवठा केला जातो.

महापालिकेने बालाजी कॉलेज, म्हाळुंगे, बालेवाडी, मोशीतील सामाजिक न्याय विभागाची मुले आणि मुलींचे वसतिगृह, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, रिजनल टेलिकॉम सेंटर, इंदिरा कॉलेज, आदिवासी विभाग मुलींचे वसतिगृह आदी ठिकाणी करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. येथील रुग्ण, डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना सकाळचा नाश्‍ता, दोन वेळचा चहा, जेवण या प्रकारचा आहार उपलब्ध करून देण्यात येतो. जेवण पुरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुरवठादार नेमण्यात आले आहेत. या पुरवठादारामार्फत प्रतिदिन प्रतीव्यक्ती 180 रुपये दराने जेवण आणि नाश्‍ता पुरवविला जातो.

काही पुरवठादारांनी जुलै महिन्यात दोन आठवडे आहार पुरविला आहे. त्यासाठी 63 लाख रुपये खर्च झाला आहे. तर सावित्री स्वंयरोजगार संस्थेने 26 दिवसांचा 41 लाख 82 हजार रुपयांचा आहार पुरविला आहे. त्यानुसार एकूण 1 कोटी 4 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

परदेशी नागरिकांच्या आहारासाठी 38 लाख खर्च

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. तसेच शहरातील नातेवाईकांकडे परदेशातून आलेलल्या नागरिकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. त्यांना बाणेर रोड येथील टॅब किचन या पुरवठादारामार्फत प्रतिदिन प्रतिव्यक्ती 250 रुपये दराने जेवण आणि नाश्‍ता पुरविला जातो. पुरवठादाराने 25 मे ते 9 जुलै या कालावधीत आहार पुरविला आहे. त्यासाठी 38 लाख 71 हजार रुपये खर्च आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post