वाकड पोलिसांनी केला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
PRESS MEDIA LIVE : पिंपरी :
पिंपरी – थेरगाव येथील एका सोसायटीत सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सहा तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोन महिलांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपींना 14 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
फरजाना इस्माईल पठाण, अर्चना अजिनाथ कांबळे आणि दलाल सचिन अशोक खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांना थेरगाव येथील एका सोसायटीत सेक्स रॅकेट सुरू असून दोन महिला आणि दलाल हे फोनद्वारे चॅटिंग करुन लोकांशी संपर्क करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी छापा घालून सहा तरुणींची सुटका केली. तसेच त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या फरजाना पठाण आणि अर्चना कांबळे दलाल सचिन खंडागळे यांना अटक केली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहायक निरीक्षक हरिश माने, उपनिरीक्षक संगिता गोडे, प्रणिल चौगले, सिध्दनाथ बाबर, कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, सुरज सुतार, बापुसाहेब धुमाळ, बिभीषन कन्हेरकर, दिपक भोसले, प्रमोद कदम, तात्यासाहेब शिंदे, मोहिनी थोपटे, तिटकारे, सरोदे,अलबर यांच्या पथकाने ही कारवाई केली.