राज्य शासन सकारात्मक.



लोककलावंताचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यशासन सकारात्मक.

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख.

PRESS MEDIA LIVE :

नारायणगाव (पुणे) - तमाशा लोककलेतून समाजात विविध विषयांवर जागृती निर्माण करण्याबरोबरच समाजाचे प्रबोधन करणाऱ्या लोककलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

मुंबई येथे बुधवारी (दि. 23) मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख व सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांची भेट आमदार अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदचे अध्यक्ष अविष्कार मुळे, कार्याध्यक्ष संभाजीराजे जाधव, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, शरद कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, अभिनेते सुशांत शेलार यांनी घेतली.राज्यातील कोविड-19 ची परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. राज्यातील लोक कलावंतांना उभारी देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असून लोकनाट्य सादर करणाऱ्या कलाकारांनी मांडलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोविडमुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन कालावधीत कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होत नसल्याने लोककलावंतांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लोककलावंताना लोककला सादर करण्याची परवानगी मिळावी, संगीतबारी आणि तमाशा असे वेगवेगळे प्रकार करण्यात यावेत, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, लोककलावंत यांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे, लोककलावंतासाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने कल्याणकारी आर्थिक विकास महामंडळ करावे, कलावंतांना मिळणारे अनुदान वेळेत मिळावे, लोककलावंतासाठी विमा योजना आणि आरोग्य योजना असाव्यात अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post