अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी...

 

अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी शिवसेनेने अतिरेक करू नये

सत्तेत असलेल्या शिवसेनेने सरकारी दादागिरी करू नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा इशारा

मुंबई विमानतळावर रिपब्लिकन पक्षाचा अभिनेत्री कंगना राणावत च्या संरक्षणासाठी एल्गार

PRESS MEDIA LIVE : मुंबई :

मुंबई दि. 9 - अभिनेत्री कंगना राणावत यांनी जय महाराष्ट्र जय मुंबई अशी भूमिका घेऊन आपण महाराष्ट्रभक्त असल्याचे म्हंटले आहे त्यामुळे शिवसेनेने कंगना बद्दल विरोधाचा अतिरेक करू नये.आता शिवसेने शांतता ठेवावी.कंगना चे कार्यलय मनपा ने तोडण्याची कारवाई  हा अतिरेक होता.  शिवसेना सत्तेत आहे.त्यांनी सरकारी दादागिरी करू नये असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी शिवसेने ला केले आहे. 

आज मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज  आंतरराष्ट्रीय विमानतळावर अभिनेत्री कंगना राणावत चे आगमन होत असताना तिच्या संरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एल्गार केला अशी माहिती ना रामदास आठवले यांनी दिली. 

 मुंबई च्या विषयावर कंगना राणावत ने सुरुवातीला पीओके ची उपमा देण्याच्या भूमिकेचे आम्ही समर्थन करीत नाही. त्यांनंतर कंगना ने जय मुंबई महाराष्ट्राची भूमिका घेऊन त्याबद्दल माफी मागितली असल्यासारखे आहे. त्यामुळे शिवसेने ने आता शांत व्हावे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे महिलांचा सन्मान करणारे नेते होते.  शिवसेनेने आता अभिनेत्री महिला  असणाऱ्या कंगना बाबत चा अतिरेक थांबवावा. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार आहे. कंगणाच्या रक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन विषय थांबवावा असे मी त्यांना सुचविणार आहे.  आज  शिवसेने ची सत्ता असणाऱ्या मुंबई मनपा ने कंगना च्या कार्यालयावर तोडक कारवाई करणे म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करणे आहे. बदला घेण्याचा प्रकार आहे. हा अतिरेक शिवसेने थांबवला पाहिजे. मी लवकर च कंगना राणावत ला भेटणार आहे.ज्या मुंबई मनपा अधिकाऱ्यांनी कंगना चे कार्यालय तोडले त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कंगना ने कोर्टात जाण्याचा मी सल्ला देणार आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले. 

 कोणत्याही महिलेबद्दल हरामखोर वगैरे शब्द वापरणे चूक आहे. तोंड फोडायचे तर चीन आणि  पकीस्तानचे फोडा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. शरद पवार यांनी कंगना राणावत प्रकरणाबाबत केलेले वक्तव्य  सूचक आहे.  उद्धव ठाकरे यांचे सरकार लवकर च पडेल  असे ना रामदास आठवले म्हणाले. 


           

             

Post a Comment

Previous Post Next Post