लातूर जिल्ह्यात खत घोटाळे ,

 सोळा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबीत, लातूर जिल्ह्यात खत घोटाळे.

       जिल्ह्यात सोळा विक्रेत्यांनी केवळ 24 जणांना सात हजार 198 पोते खत विक्री करून घोटाळा केल्याचे समोर आले होते. याचे वृत्त `सकाळ`ने मंगळवारच्या (ता. एक) अंकात प्रसिद्ध करताच कृषी विभागातील अधिकारी घडबडून जागे झाले. याच दिवशी तातडीने या अधिकाऱ्यांनी युरियाची विक्री करणाऱ्या सोळा कृषी सेवा केंद्रांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यात एका विक्रेत्याचा परवाना कायम स्वरुपी निलंबित केला आहे. एकाचा तीन महिन्यासाठी, दोघांचा दोन महिन्यासाठी, अकरा जणांचा एक महिन्यासाठी तर एकाचा पंधरा दिवसासाठी परवाना निलंबित केला आहे.

कोरोना काळातील मोठा रेशनिंग तांदूळ काळाबाजार उघड,तीन जणांना अटक

           सर्वसामान्य गोरगरीबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगचा तांदूळ तो त्यांना न मिळता थेट परदेशात निर्यात करण्यात आला. हा सर्वात मोठा काळाबाजार नवी मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. कोविड-१९ काळात गरीब जनतेला पुरवण्यात येणार रेशनिगचा तांदूळ थेट त्यांना न मिळता १३ दक्षिण आफ्रीकन देशात निर्यात होत असल्याचे पुढे आले आहे.हा रेशनिगचा तांदूळ कर्नाटक, हरियाना,चंदीगड आणि महाराष्ट्र राज्यातून आणण्यात आला होता. आतापर्यंत नवी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने २७० मेट्रीक टन तांदूळ जप्त केला आहे. तसेच गेल्या आठ महिन्यात ३२,८२७ मेट्रीक टन तांदूळ या दक्षिण आफ्रीकन देशात निर्यात केला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post