काटेकोर अंमलबजावणी केली जाणार.

   कोरोनाचा वाढतात संसर्ग कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी केली जाणार.  

जिल्हाधिकारी दौलत देसाई.

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :

कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक क्षेत्रात काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. प्रशासनाकडून कार्यवाही होईलच मात्र, त्यापेक्षा लोकांचा सहभाग अधिक महत्त्वाचा आहे. यामुळे हा सहभाग वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जि ल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. योग्य पद्धतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे आणि कमीत कमी वेळेत रुग्ण शोधून काढण्यात यश आले, तर वाढता संसर्ग कमी करता येणे शक्य आहे. यामुळे जिल्हा प्रशासनानेही आता होम टू होम सर्व्हे (आरोग्य चौकशी) करण्याचा निर्णय घेतला आहे.या सर्वेक्षणात लोकांचा सहभाग अधिक वाढवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी  सांगितले.

सर्वेक्षणात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा राहील, असे सांगत देसाई म्हणाले, परिसरातील नागरिक, तालीम संस्था, तरुण मंडळे, सामाजिक संस्था, संघटनांचा सहभाग वाढवावा लागेल. हे सर्वजण या सर्वेक्षणात सहभागी झाले, तर नेमकी माहिती वेळेत उपलब्ध होण्यास मदत होईल. त्याद‍ृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वेक्षणादरम्यान दररोज रिपोर्टिंग करण्यात येणार असल्याचे सांगत यावेळी लक्षणे आढळलेले नागरिक, बाधितांच्या संपर्कातील नागरिक आदींचा दररोज आढावा घेतला.त्यानुसार त्यांची आरोग्य तपासणी झाली की नाही, याबाबतही दररोज आढावा घेतला जाईल. त्यानुसार संंबंधितांची वैद्यकीय तपासणी, स्वॅब घेणे आदी आवश्यक ती कार्यवाहीही केली जाईल. ज्यांना लक्षणे असतील, त्रास होत असेल त्यांनी घरात बसू नये, पुढे यावे, तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही देसाई यांनी केले.

बाधित रुग्ण आढळल्यानंतर तो राहत असलेला अथवा ज्या ठिकाणी तो आढळून आला, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जातो. या क्षेत्रातील सर्व व्यवहार सुमारे 15 दिवस बंद ठेवले जातात. हा कन्टेंन्मेंट झोन म्हणजे त्या क्षेत्रापुरता कडक लॉकडाऊनच असतो, असे सांगत देसाई म्हणाले, सध्या अशा प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी अमंलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळेही संसर्ग वाढण्याचा धोका आहे. यामुळे प्रतिबंधित क्षेत्र प्रसंगी कमी केले जाईल, एकाच गल्‍ली पुरतेही ते मर्यादित राहील; पण त्या प्रतिबंधित क्षेत्रात कडक अंमलबजावणी केली जाईल. त्याद‍ृष्टीने संबंधितांना सूचनाही देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post