आयजीएम रुग्णालयात हायफ्लो ऑक्सिजन नोझल

आयजीएम रुग्णालयात हायफ्लो ऑक्‍सीजन नोझलची सुविधा असणारे आणखी 50 व्हेंटीलेटर बेड लवकरच उपलब्ध होणार 

आमदार प्रकाश आवाडे 

PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी ( मनु फरास ) :

आयजीएम रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार आवाडे म्हणाले, "आयजीएम रुग्णालयात 20 बेडचे आयसीयु युनिट सुरु आहे. येथे सध्या 10 व्हेंटीलेटर उपलब्ध आहेत. आता आणखी 50 बेड उपलब्ध केले जाणार असून तेथे व्हेंटीलेटरसाठी आवश्‍यक असलेले हायफ्लो ऑक्‍सीजन किट उपलब्ध असणार आहे. त्यामुळे 70 बेडचे आयसीयु युनिट तयार होणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.याशिवाय सहा हजार लिटर्सचा ऑक्‍सीजन टॅंक आला असून तो बसवण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. त्यामुळे ऑक्‍सीजनचा तुटवटा यापुढे भासणार नाही.'

आयजीएम रुग्णालयाबद्दल अद्याप काहीजणांच्या मनात राग आहे. ते रुग्णालयाबद्दल उलट- सुलट बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण आज कठिण प्रसंगात आयजीएम रुग्णालय अनेक कोरोना रुग्णांचा आधार ठरले आहे. 200 बेडची शासन दरबारी नोंद असली तरी एकाचवेळी 285 पर्यंत रुग्णांची उपचार घेतला आहे.  रुग्णालयासाठी लोकसहभागातून डायलेसीस व सिटी स्कॅन मशिन आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारण सीपीआर रुग्णालय आता सामान्य रुग्णालय राहिलेले नाही. ते आता वैद्यकीय कॉलेज झाले आहे. 300 बेडची क्षमता असलेल्या आयजीएम रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनिल पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर उपस्थीत होते.

सीसीटीव्हीची नजर

आयजीएम रुग्णालयाच्या कामकाजाला शिस्त लागावी, यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी आपण केली होती. त्यानुसार रुग्णालयात 64 सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता रुग्णालयात शिस्त आली आहे, असे आवाडे यांनी सांगितले.

नवीन रुग्णवाहिका मिळणार

आयजीएम रुग्णालयासाठी आमदार फंडातून नविन रुग्णवाहिका दिली जाणार आहे. येत्या आठ दिवसांत ही रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहे, अशी माहिती आमदार आवाडे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post