इचलकरंजी मध्ये जनता कर्फ्यु करने योग्य नाही.
आमदार प्रकाश आण्णा आवाडे.
इचलकरंजी : आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी कोरोनावर मात करून ताराराणी पक्ष कार्यालय इचलकरंजी येथे आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
अतिगंभीर कोरोना रुग्णांना हाय लिक्विड ऑक्सिजन ची गरज असते. यासाठी पाठपुरावा केल्यानंतर आय.जी.एम कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांसाठी *६००० लिटर ऑक्सिजन जम्बो सिलेंडरची टाकी ,८ हायफ्लो नेझल लिक्विड ऑक्सिजन, ५ ड्युरा सिलेंडर, २० आय सी यु बेड, स्पेशल कोरोना वॉर्ड मध्ये ७५ बेड , जनरल वॉर्डमधील १२० बेडला डायरेक्ट ऑक्सिजन पाॅइंट काढून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे काम सुरु झाले आहे.* तसेच आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या *आमदार फंडातून आय.जी.एम हॉस्पिटलसाठी ॲम्बुलन्सची मंजुरी मिळालेली आहे.* आणि आय.जी.एम रूग्णालयातील कारभार सुस्थितीत यावा यासाठी, *सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठीची मागणी केली होती. हि मागणी मंजूर होऊन प्रत्यक्ष ६४ सीसीटीव्ही कॅमेरे चालू झाले आहेत.
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात इतर भागात जनता कर्फू सुरु आहे. पण इचलकरंजीची परिस्थिती लक्षात घेता, उद्योगधंदे व व्यापार सुरळीत चालु झाले असल्यामुळे इचलकरंजी मध्ये जनता कर्फू करणे योग्य नाही, असे मत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी मांडले.
गोरगरीबांसाठी आयजीएम हॉस्पिटल हे कोरोना उपचारासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल *जिल्हा रुग्णालय होण्यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे प्रयत्न सुरु आहेत.*
या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे (साहेब) , ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनील पाटील, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, कपिल शेटके व पत्रकार उपस्थित होते.