PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :
*सुप्रभात , 'वैज्ञानिक समाजवादी खुले ज्ञानपीठ' हे ब्रीद घेऊन गेली ४४ वर्षे लोकप्रबोधनाचे अखंड काम करणाऱ्या 'समाजवादी प्रबोधिनी ' संस्थेच्या कार्याची ओळख आणि प्रबोधन प्रक्रियेचा आढावा घेणारा संवाद आज सोमवार ता. ७ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत मी करणार आहे.राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित या 'संघर्षात्मक रचना संवाद ' मध्ये आपणही जरूर सहभागी व्हा ही नम्र विनंती.*
*संघर्षात्मक रचना- संवाद*
*समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी*
'समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी' ही लोकप्रबोधनाचा अविरत ध्यास घेऊन गेली त्रेचाळीस वर्षे सातत्यपूर्ण आणि महत्वपूर्ण काम करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. 'वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ' हे ब्रीद घेऊन या संस्थेची स्थापना ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक ,थोर विचारवंत कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने ११ मे १९७७ रोजी स्थापन झाली.
प्राचार्य ए.ए.पाटील, भाई ज्ञा.शां.नार्वेकर, आचार्य शांताराम गरुड, प्रा.डॉ.एन.डी.पाटील, ऍड.गोविंद पानसरे, ऍड.डी.ए.माने, प्राचार्य एम.डी.देशपांडे, पी.बी.साळुंखे, बाळासाहेब पोतदार, वि.स.पागे या मान्यवरांनी एकत्र येऊन समाजवादी प्रबोधिनीची स्थापना केली. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे सैद्धांतिक प्रबोधन करणे आणि राजकारण व समाजकारणाचा मूल्याधिष्ठित पाया बळकट करणे हा मुख्य हेतू ठेवून तिची स्थापना झाली.
आजही त्यासाठी सक्रिय कार्य अनेक उपक्रमांद्वारे अखंडपणे सुरू आहे. आचार्य शांताराम गरुड हे ३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश झाले. त्यानंतर ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रबोधिनीची जोमाने वाटचाल सुरु आहे.
गेल्या त्रेचाळीस वर्षात व्याख्याने, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, अभ्यासशिबीरे, मेळावे, परिसंवाद, सभा - संमेलने असे पाच हजारांवर उपक्रम प्रबोधिनीने राबविले आहेत.राष्टीय - आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मान्यवर यात सहभागी झाले आहेत. कोल्हापूर,सांगली,सातारा,सोलापूर, सिंधुदुर्ग, बेळगाव आदी जिल्ह्यात प्रामुख्याने प्रबोधिनी कार्यरत आहे. इचलकरंजी येथे संस्थेचे सुसज्ज असे 'प्रबोधन वाचनालय ' आहे.१९८४ साली सुरू केलेल्या या शासनमान्य 'अ ' वर्ग ग्रंथालयात आज अठ्ठावीस हजार पुस्तके आहेत. शंभरावर नियतकालिके तेथे येत असतात.दरवर्षी उत्तमोत्तम पुस्तकांनी हे ग्रंथालय समृद्ध केले जाते.
समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सकस वैचारिक शिदोरी देणारे 'प्रबोधन प्रकाशन ज्योती ' नावाचे 'मासिक' जानेवारी १९९० मध्ये सुरू करण्यात आले.गेली एकतीस वर्षे हे मासिक नियमितपणे प्रकाशित होत आहे.
लेखक,वक्ते,संपादक,गझलकार अशी ओळख असलेले प्रसाद माधव कुलकर्णी हे गेली पस्तीस वर्षे समाजवादी प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून संस्थेच्या सर्वांगीण विकासात सक्रिय योगदान देत आहेत तसेच अनेक मान्यवर या संस्थेच्या कामाशी नियमितपणे जोडले गेलेले आहेत.
व्यक्ती सक्षम झाली की समाज सक्षम बनतो व त्यातूनच पुढे राष्ट्र बळकट बनते.हा सिद्धांत शास्त्रीय व शाश्वतही आहे.त्यामुळे व्यक्तीच्या प्रबोधनाची नितांत गरज असते.ही समाजवादी प्रबोधिनीची भूमिका आहे.
◆समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने राष्ट्रीय एकात्मतेपासून मतदार जागृती पर्यंत अनेक मोहीमा सातत्याने राबविल्या जातात.
◆भारतीय राज्यघटनेच्या प्रसार व प्रचार मोहिमा आखल्या. सलग बेचाळीस वर्षे केंद्रीय अर्थसंकल्प व्याख्यानमाला सुरू आहे.
◆भारतरत्न डॉ.आंबेडकर व्याख्यानमाला सलग पस्तीस वर्षे सुरू आहे.मुक्तांगणच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या साप्ताहिक बैठका गेली वीस वर्षे प्रबोधिनीत होत असतात.
◆मतदान नव्हे तर 'मताधिकार', प्रजासत्ताक नव्हे तर 'लोकसत्ताक ' असे शब्द त्यामागील सैद्धांतिक भूमिकेसह रुजविण्यात प्रबोधिनी आग्रही राहिली आहे.
नवे लेखक घडविणे,नवे अभ्यासु वक्ते तयार करणे याकडे विशेष लक्ष देऊन काम सुरू असते.
सोमवार, दि. 7 सप्टेंबर
संघर्षात्मक संवाद - फेसबुक लाईव्ह
साथी प्रसाद माधव कुलकर्णी
समाजवादी प्रबोधिनी
संध्याकाळी 6.30 ते 7.30
https://www.facebook.com/RSDIndian
नक्