मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड.

 


 मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेत्री सरोज  सुखटणकर  काळाच्या पडद्याआड.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :

इचलकरंजी : मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर यांचे आज निधन झाले. त्या 84 वर्षाच्या होत्या. त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचे मूळ गाव असलेल्या रुई (ता.हातकणंगले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रुईमधील न्यू भारत नाट्य क्लबच्या माध्यमातून नाटकांमध्ये अभिनय करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. कोल्हापूरमध्ये त्या स्थायिक झाल्या होत्या. विर्दभ, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी त्याकाळी नाटकाचे अनेक दौरे केले. 50 हून अधिक नाटकांमध्ये त्याकाळी गाजलेल्या 'नर्तकी' या त्यांच्या नाटकाचे 300 हून अधिक प्रयोग झाले होते. 'वादळवेल' या नाटकांमधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली होती.

कालांतरांने त्यांना मराठी चित्रपटांमध्ये चरित्र्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक दिग्गज अभिनेत्यांबरोबर त्यांनी चित्रपटात काम केले आहे. एकटा जीव सदाशिव, जोतीबाचा नवस, दे दणादण, लेक चालली सासरला अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. अकला कुबल निर्मित धनगरवाडा हा शेवटचा चित्रपट केला होता.

या शिवाय त्यांनी अमृतवेल आणि तुझ्यात जीव रंगला या दुरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतीक विभागाच्यावतीनेही त्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. त्यांच्या या निधनामुळे जुन्या काळातील एक अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. विविध भूमिका पार पाडल्या.

Post a Comment

Previous Post Next Post