धोबी समाज आरक्षण फाईल अंतिम टप्प्यात.



धोबी समाज आरक्षण फाईल अंतिम टप्प्यात :बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती.

PRESS MEDIA LIVE  :बीड  :

राज्यातील धोबी समाजाला पूर्ववत आरक्षण लागू व्हावे म्हणून विहित नमुन्यात दुरुस्तीसह केंद्रीय सामाजिक न्याय विभागाला पाठवायचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून राज्य मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षणाची तपशीलवार माहिती मिळाल्यावर रकाना भरून अहवाल पाठवण्याच्या सूचना सामाजिक न्याय विभागाला दिला असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.


महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळाच्या वतीने समाजाच्या आरक्षण प्रश्नी तत्काळ उपाययोजना व्हावी अशी सातत्याने मागणी होत होती.गेल्या आठवड्यात २४ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संघटनेने काळे निवेदन देत काळे निषेध आंदोलन सुद्धा केले होते.त्याची दखल घेत मंत्री धंनजय मुंडे यांनी समाजाच्या प्रातिनिधिक शिष्टमंडळाची आंबेजोगाई (जि.बीड) येथील शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावली होती.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत धोबी समाजाच्या आरक्षण फाईलवर सुरू असलेल्या कामाचा उहापोह करण्यात आला.

बैठकीत मंत्री मुंडे यांनी धोबी समाज आरक्षण फाईलमधील अडचणी सांगून यावेळी परिपूर्ण व बिनचूक अहवाल पाठवला जाईल त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू असल्याचे पदाधिकाऱ्यांसमोर नमूद करत महाविकास आघाडी सरकार धोबी समाजासह इतर सर्व छोट्या जातींना निश्चित मदतीची भावना ठेवून काम करीत असल्याचे स्पष्ट केले.

मंत्री मुंडे यांच्यासोबतच्या बैठकीला प्रदेश कार्याध्यक्ष गणेश जगताप,प्रदेश कोषाध्यक्ष गोपी अण्णा चाकर, राज्य उपाध्यक्ष सर्जेराव भागवत,राज्य संघटक विलासराव जाधव,मराठवाडा विभागीय अध्यक्ष शंकर बनसोडे,विभागीय युवक अध्यक्ष अँड.सुधीर जाधव,युवक जिल्हाध्यक्ष सचिन जाधव,
शहराध्यक्ष अर्जुन जाधव,जिल्हा उपाध्यक्ष उत्तरेश्वर सोळंके, अशोक दळवे,मंगेश घोडके, प्रवीण साळुंखे,रवींद्र जाधव, योगेश जाधव,शशिकांत दळवे, गगन कांबळे,प्रशांत मानकर,सोनू बुंदेले आदी उपस्थित होते.

शिष्टमंडळाची बैठक लावण्यासाठी अंबाजोगाई पिपल्स बँकेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष राजकिशोर (पापाशेठ) मोदी यांनी विशेष पाठपुरावा व सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post