बेडकिहाळ येथे तिघांना...

  बेडकिहाळ येथे  तिघांना कोरोनाची बाधा

PRESS MEDIA LIVE : बेडकिहाळ :  

   ( विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी)

बेडकिहाळ येथील सिध्दार्थ नगर परिसरातील ३० वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. १९ अॉगस्ट ला  हा युवक बेंगळुरूला कामानिमित्त गेला होता. दि: २१ रोजी परत आल्यानंतर त्या युवकांमध्ये कोरोनाची लक्षने आढळून आली. चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात दि ३० रोजी स्वॅब चेक केला. दि ३१ रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने बेडकिहाळ ग्राम पंचायत, आरोग्य केंद्राच्या कर्मचारींनी होम व्हेंनटीलेटरवर ठेऊन घर सीलडाऊन केले आहेत.या युवकाच्या १५ जन संपर्कात आल्याचे समजते.

    बेडकिहाळ येथील शांतीनगर परिसरातील एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.सदर महिलेला कोरोनाची लक्षने आढळून आल्यावर इचलकरंजी येथे कोरोना टेस्ट केल्यास रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. यांच्या संपर्कात ५ जन आल्याचे समजते. त्यांचे घर सीलडाऊन करण्यात आले आहे. 

   तसेच भोज बेडकिहाळ मार्गावर एका २४ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. सदर युवक कोरोनाची लक्षने आढळून आल्यावर स्वताहुन चाचनी करुन घेतली.त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी दोन युवकाला व एक युवतीला कोरोनाची बाधा झाल्याने बेडकिहाळ परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post