बेडकिहाळ कर्नाटक


 

बेडकिहाळ क्रुषीपत्तीन सहकारी संघामध्ये शिवाप्पा बाबु सुभेदार यांची संचालक पदी निवड.

PRESS MEDIA LIVE :. बेडकिहाळ :  विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :

बेडकिहाळ येथील प्राथमिक क्रुषी पत्तीन सहकारी संघाच्या नुतन संचालक पदी शिवाप्पा सुभेदार यांची बेळगाव डी.सी.सी.बॅंकेचे अध्यक्ष  रमेश विश्वनाथ कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली सुभेदार यांची एकमताने निवड करण्यात आली. 

    सुभेदार हे सामाजिक कार्यामध्ये आपला ठसा उमटवुन ठेवला आहे. त्यांनी अनेकवेळा ग्राम पंचायतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले आहेत. त्यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेचे दिसुन आले.   गुलाल व फटाक्यांच्या आतीषबाजीने परिसर दनानुन गेला. क्रुषी पत्तीन सहकारी संघाचे सेक्रेटरी श्री अजित धन्नापगोळ यांना निवडीचे पत्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये देऊन संचालक पदी विराजमान झाले. 

    त्यांच्या अगोदर मल्लगौंडा बाबुराव पाटील हे २९-१०-२०१८ रोजी त्यांचीही अशीच संचालक पदी निवड करण्यात आली होती. त्यांचे आता संचालक पद रद्द करुन बेळगाव च्या डी.सी.सी. बॅंकेने नवीन संचालक पदी सुभेदार यांची  निवड केल्याचे पत्र त्यांना दिले. त्यावेळी शेतकरी वर्ग व तरुण युवा पिढी उपस्थित होते. ही सर्व माहिती संघाचे सेक्रेटरी अजित धन्नापगोळ यांनी दिली आहे. या संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहे.  अशा वेळी निवड झाल्याबद्दल त्यांचे बेडकिहाळ व परिसरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post