अधिकारी सावलीत ज्येष्ठ नागरिक उन्हात
हयातीच्या दाखल्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा जीव टांगणीला
PRESS MEDIA LIVE : हुपरी :
कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला लागत आहेत. ही संतापजनक बाब आहे. विशेषतः हुपरीसारख्या ग्रामीण भागात हे नागरिक बँकेसमोर रांगा लावून उभे आहेत.
श्रावण बाळ योजनेंतर्गत सरकार जेष्ठ नागरिकांना दर महिना पेन्शन देते. ती रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा होते. सध्या कोरोनाचा कहर चालू आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासन करीत असताना याउलट गेले आठवडाभर कडकडीत ऊन आणि भर पावसात जेष्ठ नागरिकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँक तसेच तलाठी कार्यालयाचे हुंबरे झिजवायला बॅंकेच्या दारात चरचरीत उन्हात हयातीचा दाखला मिळवण्यासाठी उभे असलेले जेष्ठ नागरिक पाहायला मिळत आहे, ही संतापजनक बाब आहे.
डिजिलयटेशनच्या युगात कागद विरहित काम करण्याची गरज असतांना कागदाची भेंडोळी घेऊन या कार्यालयातून त्या कार्यालयात वृद्ध आजी-आजोबा हेलपाटे मारत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बँक खात्याला आधार कार्ड लिंक केले आहे. पॉज मशीनवर बोट ठेवताच तीच व्यक्ती आहे कि नाही, समजत असतांनासुद्धा लेखी हयातीच्या दाखल्याची सक्ती कशासाठी? असा सवाल जेष्ठ नागरिक करीत आहेत. अधिकारी सावलीत आणि जेष्ठ नागरिक उन्हात अशी स्थिती दिसत आहे. याशिवाय तलाठी कार्यालयात दाखल्यासाठी प्रत्येकाला २० रुपये दक्षिणा दयावी लागत आहे, ती वेगळीच.
कोरोना काळात जेष्ठ नागरिकांना जपणे गरजेचे असताना आणि अशा नागरिकांना घरपोच सेवा देण्याची गरज असतांना कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता रांगेत उभे करून एक प्रकारे प्रशासन हजार रुपड्यासाठी जेष्ठ नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. आहेत.