इचलकरंजी. उत्तम प्रतीचे शिक्षण मिळणे प्रत्येक नागरिकांची मूलभूत गरज

उत्तम प्रतीचे शिक्षण मिळणे प्रत्येक नागरिकांची मूलभूत गरज.

 
PRESS MEDIA LIVE :  इचलकंजी :  ( प्रतिनिधी)

इचलकरंजी ता.३, आपल्या पाल्याला आपल्या निवासस्थानापासून नजीकच्या अंतरावर उत्तम प्रतीचे शिक्षण मिळणे ही प्रत्येक  नागरिकांची  मूलभूत गरज आहे. ती पुरवणे राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. अशावेळी केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण शिक्षणाचे व्यापारीकरण करत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात समन्वयापेक्षा संघर्ष वाढवण्याची शक्यता आहे. आणि समते पेक्षा विषमता वाढण्याची भीती आहे. शिक्षणा वरून व्यक्तीचे स्थान न ठरता त्याच्या स्थानावरून शिक्षणाची मर्यादा ठरवली असेल तर शिक्षणात मनुष्यनिर्मित नवी वर्णवादी उतरंड निर्माण होऊ शकते.कोरोनाच्या काळात कोणत्याही चर्चेविना अशी महत्वाची  विधेयके आणणे व मंजूर करणे हेच मुळात सुसंस्कृत पणाचे लक्षण नाही असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम अपराध यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चेत " नवे शैक्षणिक धोरण " या विषयावरील चर्चासत्राच्या समारोपात बोलत होते.प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी प्रस्ताविकातून या धोरणाच्या वरवरच्या शब्दजालात न अडकता तपशिलात जाऊन विचार केला पाहिजे असे स्पष्ट केले.या वेळी या धोरणाचे सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक इष्ट - अनिष्ट परिणाम काय व कसे होतील याची मांडणी चर्चेतून पुढे आली.
                        या चर्चासत्रात १८८२ साली महात्मा फुले यांनी शिक्षणविषयक हंटर कमिशनला दिलेले निवेदन, १९०६ ची राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना,स्वातंत्र्यानंतर नेमले गेलेले शिक्षण विषयक आयोग,१९८६ चे शैक्षणिक धोरण,प्रगत देशांच्या तुलनेत भारतात शिक्षणावर होणारा खर्च ,विविध राजकीय व सामाजिक विचारधारांचा शिक्षण विषयक दृष्टिकोन आदी अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रारंभी ज्येष्ठ अधिकारी व लेखक राम प्रधान,सौ.इंदुमती आवाडे उर्फ आऊ, निला सत्यनारायण यांच्यासह कालवश झालेल्याना आदरांजली  वाहण्यात आली.या चर्चेत शशांक बावचकर,प्रा.रमेश लवटे,राजन मुठाणे,पांडुरंग पिसे,शंकर भम्बीष्टे,प्रशांत लोले यांनी आपली मते व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post