वाळू तस्कराचा पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला

 

वाळू तस्कराचा पोलीस पाटलांवर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न

या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.


PRESS MEDIA LIVE :. यवतमाळ :

यवतमाळ : नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळूउत्खननाला विरोध केल्याने वाळूतस्कराने आपल्या साथीदारांसह पोलिस पाटलावर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (ता. २४) सायंकाळी दारव्हा तालुक्‍यातील सावंगी येथे घडली. घटनेची गंभीर दखल घेत लाडखेड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे

प्रकाश जाधव (रा. सावंगी) असे जखमी असलेल्या पोलिस पाटलाचे नाव आहे. महागाव (कसबा) येथील आरिफ मलनास (वय ४२) असे वाळूमाफियाचे नाव आहे. वडगाव गाढवे परिसरातील अडाण नदीपात्रातून मागील काही महिन्यांपासून वाळूचा अवैध उपसा करण्यात येत आहे. या परिसरात वाळूमाफियांची दादागिरी चालत असल्याने त्यांना आतापर्यंत कुणीही विरोधवाळूचे वाहन सावंगी येथील रस्त्याने चालत असल्याने रस्त्याची दुरवस्थादेखील झालेली आहे. शेतकऱ्यांना शेतात जाताना अडचणी निर्माण झाली.

गावकऱ्यांना विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने अखेर पोलिस पाटील जाधव यांनी मलनस याला वाळूउपसा करण्यास मनाई केली. त्यामुळे वचपा काढण्यासाठी आरिफ मलनस याने आपल्या साथीदारांना घेऊन तलवार, लोखंडी रॉड, चाकू घेऊन सोमवारी (ता. २४) पोलिस पाटलाचे घर गाठले. शिवीगाळ करीत प्रकाश पाटील यांच्यावर हल्ला चढविला. जाधव यांनी आरडाओरड केल्याने नातेवाईक व गावकऱ्यांनी धाव घेतली. त्यामुळे मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला

जखमी पोलिस पाटील यांना तत्काळ उपचारासाठी यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. लाडखेड पोलिसांनी आरिफ मलनस याच्यासह साथीदारांना अटक केली. पुढील तपास ठाणेदार विनय कारेगावकर करीत आहेत.

                                 माफिया झाले मालामाल

वाळूघाटांचे लिलाव झाले नाहीत. तरीदेखील नदीपात्रातून वाळूउपसा सुरूच आहे. अवैधरीत्या उपसा करून त्याचा साठा केला जातो. चढ्याभावाने विक्री केली जाते. वाळूतस्करीतून माफिया मालामाल झाले आहेत. कुठेही अडचण आल्यास पैसे देण्याची तयारी त्यांच्याकडून ठेवली जात आहे. आपला दबदबा निर्माण करण्यासाठी गुंडांचा आधार घेतला जात आहे. केला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post