यड्राव येथील शामराव पाटील ( यड्रावकर)

 यड्राव येथील शामराव पाटील (यड्रावकर) पतसंस्थेस शासनाची मान्यता.

आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर संस्थापक चेअरमन.

यड्राव –  येथील सहकार महर्षी शामराव पाटील (यड्रावकर) ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या., यड्राव या पतसंस्थेस शासनाच्या सहकार विभागाची मान्यता मिळाली 

PRESS MEDIA LIVE :

या संस्थे च्या माध्यमातून परिसरातील उद्योजक, लघु उद्योजक, शेतकरी, व्यापारी कामगार वर्ग  व सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देऊन त्यांचे जीवन मान उंचावताना त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून त्यांना उभारी देण्याचे काम केले जाईल, तसेच ठेवीदारांचे हित जोपासण्यासाठी संस्था सदैव तत्पर राहील. तसेच संस्थेची वाढ व भरभराट याकडे तत्परतेने लक्ष देवून संस्था चांगल्याप्रकारे नावारुपास येईल याकडे विशेष प्रयत्न करणार असल्याचे संस्थेचे संस्थापक चेअरमन आदित्य राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी सांगितले.

सदर संस्थेच्या नोंदणी कामी जयसिंगपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) व सहाय्यक निबंधकसो शिरोळ प्रेम राठोडसो यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे चेअरमन आदित्य राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शेवटी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post