सिंधुदुर्गनगरी. गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर.

 गणेशोत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर....

 जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केल्या सूचना

PRESS MEDIA LIVE : सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी.

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी:-  या वर्षीचा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा याबाबत जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे कोरोनाचे संकट लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी भजन,आरत्या,फुगड्या घरगुती स्वरूपातक कराव्यात,मिरवणुका काढू नयेत असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

22 ऑगस्ट पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोना संकटाच सावट असल्याने जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना आखल्या गेल्या आहेत याच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केल्या आहेत 

गणेशोत्सवासाठी 12 ऑगस्ट पर्यत एसटीने येणाऱ्यां चाकरमान्याना 10 दिवसाचेच होम क्वांरनटाईन असणार आहे त्यांना ईपासची गरज लागणार नाही मात्र इतर खाजगी गाड्यांनी येणाऱ्यांना ईपास काढावाच लागणार आहे 12 ऑगस्ट नंतर येणाऱ्यांना 48 तास अगोदर कोविड19 टेस्ट करून यावे लागेल आणि निगेटिव्ह अहवाल असला पाहिजे तसेच त्यांना तीन दिवस होम क्वांरंटाईन रहावे लागणार आहे 

घरगुती गणपती शक्यतो कमीतकमी दिवसाचा करावा ,गणपती आगमन किंवा विसर्जनाच्या वेळी मिरवणुका काढू नये कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत विसर्जन करावे लहान मुले व जेष्ठ नागरिकांनी जाणे टाळावे गावातील वाडी किंवा चाळी मधील एकत्रित विसर्जन करू नये गणपतीची पूजा शक्यतो पुरोहितां मार्फत न करता स्वतःच करावी किंवा तंत्रज्ञानाचा वापर करावा 

आरत्या,भजने,फुगड्या ,गवरी ,वसा,हे कार्यक्रम घरगुतीच करावेत तेही गर्दी होवू न देता कारावेत ,कार्यक्रमाच्या निमित्ताने घरोघरी भेटी देणे टाळावे ,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळना तहसीलदार यांची परवानगी घ्यावी लागेल भपकेबाज न करता छोटा मंडप घालून सोशल डिस्टन्सचा ,स्वच्छतेचे व इतर सर्व नियम पाळावेत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी आशा सूचना देण्यात आल्या आहेत 

तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच यापूर्वी जसे ग्राम नियंत्रण समित्या व प्रभाग समित्यांनी सहकार्य केले तसेच यावेळीही सहकार्य करून गणेशोत्सव निर्विघन पार पाडावा असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post